मुंबई : नव्या घराच्या शोधात आलेल्या महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

By Admin | Updated: November 1, 2016 17:43 IST2016-11-01T12:05:49+5:302016-11-01T17:43:04+5:30

नवीन घराच्या शोधार्थ फिरणा-या पतीला दोरीने बांधून ठेवून त्याच्या डोळ्यासमोरच पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरीतील आंबोलीत घडली.

Mumbai: A gang rape in front of a husband in search of a new house | मुंबई : नव्या घराच्या शोधात आलेल्या महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

मुंबई : नव्या घराच्या शोधात आलेल्या महिलेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - पाडव्यानिमित्त नव्या घराच्या शोधात आलेल्या पतीचे हात पाय बांधून, त्याच्या डोळ्यासमोर २८ वर्षाच्या पत्नीवर 8 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जोगेश्वरीत घडली. घटनेनंतर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली होती, तर आठवा आरोपी फरार होता. अंबोली पोलिसांनी कारवाई करत आठव्या आरोपीलाही नंतर अटक केली. अटक केलेल्या सात आरोपींना 4 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री हे दाम्पत्य जोगेश्वरी येथील शामनगर झोपडपट्टीत एका महिलेच्या मदतीने घर शोधत होते. महिला घरी निघून गेल्यानंतर हे दोघेच घर शोधत असताना या विकृतांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी दोघांनाही घरात कोंडले. त्यानंतर पतीचे हात पाय  बांधून त्याच्या डोळ्यासमोर पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांना सोडून पसार झाले. याबाबत पतीने दिलेल्या तक्रारींनंतर सदर प्रकार उघडकीस आला.
 
याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी २० ते २५ वयोगटातील आहे. यातील एका नराधमावर आधीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
(भारतीय कॉल सेंटर्सकडून अमेरिकनांना गंडा)
(कॉल सेंटर घोटाळ्यातील कार होती विराट कोहलीच्या नावावर)
  •  
 
 
  •  
 

 

Web Title: Mumbai: A gang rape in front of a husband in search of a new house