मुंबईत दम मारो दम सुरूच, छुप्या हुक्का पार्लरवर छापा

By Admin | Updated: June 4, 2016 03:08 IST2016-06-04T03:08:38+5:302016-06-04T03:08:38+5:30

हुक्का पार्लरवर बंदी असताना छम छमपाठोपाठ हुक्का पार्लरमधील दम मारो दम... छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आले.

In Mumbai, Dum Maaro Dum started, hidden hukka parlor raid | मुंबईत दम मारो दम सुरूच, छुप्या हुक्का पार्लरवर छापा

मुंबईत दम मारो दम सुरूच, छुप्या हुक्का पार्लरवर छापा

मुंबई : हुक्का पार्लरवर बंदी असताना छम छमपाठोपाठ हुक्का पार्लरमधील दम मारो दम... छुप्या पद्धतीने सुरू असल्याचे समाजसेवा शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आले. गावदेवी आणि डी.बी. मार्ग परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात समाजसेवा शाखेने ५४ जणांना अटक केली. डी.बी. मार्ग येथील आॅपेरा हाऊस येथील रॉयल पफ हुक्का पार्लरमध्ये हुक्का सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेला मिळाली. त्यानुसार, समाजसेवा शाखेचे प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला या विभागांची तपासणी करण्यात आली. माहितीची खातरजमा होताच गुरुवारी त्यांच्या तपास पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तपास पथकाने घटनास्थळावरील हुक्का पॉट्स, फ्लेवर्स जप्त केले. या दरम्यान १६ जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅफे फुमो येथील हुक्का पार्लरवरही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून ११ हुक्का पॉट्स, ६ फ्लेवर्ससहित ३८ जणांना ताब्यात घेतले. गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ३८ जणांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: In Mumbai, Dum Maaro Dum started, hidden hukka parlor raid