शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Mumbai Drugs Case: 'नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध', फोटो शेअर करत भाजपा नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 17:04 IST

Mumbai Drugs Case: BJP नेते Mohit Kamboj यांनी Nawab Malik यांचे काही फोटो शेअर करत २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलेल्या सोहेल सय्यद उर्फ सुनील निकम (Sohail Sayyed Alias Sunil Nikam) याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मोहित कंबोज यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते, तसेच त्याचे मास्टर माईंड मोहित कंबोज होते, असा दावा मलिक यांनी केला होता. दरम्यान, आता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांचे ड्रग्स पेडलर आणि ड्रग माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांचे काही फोटो शेअर करत २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलेल्या सोहेल सय्यद उर्फ सुनील निकम याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी विचारले की, हॅलो कोण, ओळखा हा कोण? सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम. याला २०१८मध्ये अटक करण्यात आले होते. त्याचे नवाब मलिक यांच्याशी काय संबंध आहेत? त्याचे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसशी काय संबंध आहेत, असा सवाल मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून विचारला आहे.

याबाबत मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम याला २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आले होते. माझा स्पष्ट आणि थेट प्रश्न आहे की, नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी याचा काय संबंध आहे. ड्रग पेडलर आणि ड्रग माफिया ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये कारवाई कारवाई झाली, त्या सर्वांचे कनेक्शन वळून वळून कुर्ल्यापर्यंत आणि नूर मंजिलपर्यंत का जाते. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. नाव बदलून मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रग्सचा धंदा करायचा, याच्याशी काय संबंध होते याचं उत्तर नवाब मलिक यांनी द्यावं, असे आव्हान मोहित कंबोज यांनी दिले. 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारणMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी