Mumbai Drugs Case: 'नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध', फोटो शेअर करत भाजपा नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 05:03 PM2021-11-11T17:03:29+5:302021-11-11T17:04:50+5:30

Mumbai Drugs Case: BJP नेते Mohit Kamboj यांनी Nawab Malik यांचे काही फोटो शेअर करत २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलेल्या सोहेल सय्यद उर्फ सुनील निकम (Sohail Sayyed Alias Sunil Nikam) याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

Mumbai Drugs Case: Nawab Malik's relationship with accused arrested in drug case in 2018, BJP leader Mohit Kamboj's serious allegation by sharing photos | Mumbai Drugs Case: 'नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध', फोटो शेअर करत भाजपा नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Mumbai Drugs Case: 'नवाब मलिक यांचे ड्रग्स केसमध्ये अटक झालेल्या आरोपीशी संबंध', फोटो शेअर करत भाजपा नेते मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Next

मुंबई - मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच मोहित कंबोज यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते, तसेच त्याचे मास्टर माईंड मोहित कंबोज होते, असा दावा मलिक यांनी केला होता. दरम्यान, आता मोहित कंबोज यांनीही नवाब मलिक यांचे ड्रग्स पेडलर आणि ड्रग माफियांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांचे काही फोटो शेअर करत २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आलेल्या सोहेल सय्यद उर्फ सुनील निकम याच्याशी त्यांचा काय संबंध आहे, याचे उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी विचारले की, हॅलो कोण, ओळखा हा कोण? सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम. याला २०१८मध्ये अटक करण्यात आले होते. त्याचे नवाब मलिक यांच्याशी काय संबंध आहेत? त्याचे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसशी काय संबंध आहेत, असा सवाल मोहित कंबोज यांनी या ट्विटमधून विचारला आहे.

याबाबत मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोहित कंबोज म्हणाले की, सोहेल सय्यद ऊर्फ सुनील निकम याला २०१८ मध्ये ड्रग्स केसमध्ये अटक करण्यात आले होते. माझा स्पष्ट आणि थेट प्रश्न आहे की, नवाब मलिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी याचा काय संबंध आहे. ड्रग पेडलर आणि ड्रग माफिया ज्यांच्यावर गेल्या काही वर्षांत मुंबईमध्ये कारवाई कारवाई झाली, त्या सर्वांचे कनेक्शन वळून वळून कुर्ल्यापर्यंत आणि नूर मंजिलपर्यंत का जाते. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. नाव बदलून मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रग्सचा धंदा करायचा, याच्याशी काय संबंध होते याचं उत्तर नवाब मलिक यांनी द्यावं, असे आव्हान मोहित कंबोज यांनी दिले. 

Web Title: Mumbai Drugs Case: Nawab Malik's relationship with accused arrested in drug case in 2018, BJP leader Mohit Kamboj's serious allegation by sharing photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.