शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Mumbai Drugs Case: ‘नवाब मलिक माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर समोरासमोर वादविवाद करा, वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा’, भाजपा नेते मोहित कंबोज यांचे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:14 IST

Mumbai Drugs Case: Aryan Khan Drugs Case प्रकरणावरून Nawab Malik यांनी Mohit Kamboj यांच्यारही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना खुले आव्हान दिले आहे.

मुंबई - मुंबईत आलिशान क्रूझवर झालेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता आपला मोर्चा भाजपा आणि देवेंद्र फडणवीसांकडे वळवला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा काल नबाव मलिक यांनी केल्यानंतर भाजपा नेते मलिकांविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आर्यन खान प्रकरणावरून मलिकांनी मोहित कंबोज यांच्यारही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांना खुले आव्हान दिले आहे.

मोहित कंबोज यांनी एक ट्विट करून मलिक यांना हे आव्हान दिले आहे. त्या ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणतात की, नवाब मलिकजी माझ्यासोबत कुठल्याही राष्ट्रीय चॅनेलवर वादविवाद करा. वेळ, ठिकाण तुम्ही ठरवा. दरम्यान, आता कंबोज यांच्या आव्हानाला नवाब मलिक काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविरोधात मोहित कंबोज यांनी कोर्टात धाव घेत मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते.

मात्र यादरम्यान, नबाव मलिक यांनी पुन्हा एकदा मोहित कंबोज यांना लक्ष्य केले होते. तसेच मुंबई ड्रग्स प्रकरणामध्ये आर्यन खानचे खंडणीसाठी अपहरण झाले होते. तसेच या सर्व अपहरण नाट्यामागे मोहित कंबोज हे मास्टर माइंड असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. त्यानंतर हे आरोप मोहित कंबोज यांनी फेटाळून लावले होते. तसेच त्या आरोपांविरोधातही कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. 

टॅग्स :Mumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण