मुंबई काँग्रेसचा ‘जल्लोष २०१६’
By Admin | Updated: April 29, 2016 05:58 IST2016-04-29T05:58:41+5:302016-04-29T05:58:41+5:30
मुंबई काँग्रेसतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जल्लोष २०१६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचा ‘जल्लोष २०१६’
मुंबई : मुंबई काँग्रेसतर्फे १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘जल्लोष २०१६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली १ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता आचार्य अत्रे मैदान, पंतनगर, घाटकोपर पूर्व येथे साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येईले. चित्रपट अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री वर्षा उसगावकर, कवी प्रवीण दवणे हे या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती असतील. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित नृत्यागीतांचा नजराणा या सोहळ्यात पेश केला जाईल. गायक अभिजित कोसंबी व रोहीत राऊत यांची गाणी, तसेच दिपाली सय्यद आणि अश्विनी कासार यांच्या नृत्यगीतांचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल. (प्रतिनिधी)