मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक

By Admin | Updated: August 19, 2016 11:14 IST2016-08-19T11:14:18+5:302016-08-19T11:14:42+5:30

सांत आंद्रे मतदारसंघाचे भाजपचे आमदार, नामवंत साहित्यिक, फर्डे वक्ते तथा उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Mumbai: Come on. Vishnu Wagh's condition worsened | मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई : आ. विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ -  सांत आंद्रे मतदारसंघाचे भाजपचे आमदार, नामवंत साहित्यिक, फर्डे वक्ते तथा उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती चिंताजनक आहे. वाघ यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली असून मेंदूचे कार्यान्विकरण पूर्ववत होणे गरजेचे असल्याने त्यांना गोव्याहून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत.
छातीत दुखू लागल्याने वाघ यांना सोमवारी हे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) दाखल करण्यात आले होते. इस्पितळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आठ मिनिटे त्यांचे हृदय बंद पडले होते. गोमेकॉतील डॉक्टरांनी प्रयत्न करून हृदय कार्यान्वित केले. त्यांच्या मूत्रपिंडाचे कार्यही मंदावले होते. तथापि, गेल्या तीन दिवसांत त्यांचे हृदय व मूत्रपिंड कार्यान्वित झाले; पण मेंदू कार्यान्वित झाला नाही. त्यामुळे वाघ यांना मुंबईतील हिंदुजा इस्पितळात हलविण्यात आले. 

Web Title: Mumbai: Come on. Vishnu Wagh's condition worsened