शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वक्तशीरपणात मध्य रेल्वे पिछाडीवर! पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग आठव्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:53 IST

देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे.

- महेश चेमटेमुंबई : देशातील सर्व विभागांतील मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाची यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. देशातील ६९ विभागांमध्ये मध्य रेल्वेचा मुंबई विभाग ५५व्या स्थानी असून, पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागाने आठवा क्रमांक पटकावला आहे.मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणाचा साप्ताहिक अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येतो. त्यानुसार, रेल्वे बोर्डातून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वक्तशीरपणांमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात येतात.सोमवार, ६ आॅगस्ट ते रविवार, १२ आॅगस्ट या काळातील विभागीय साप्ताहिक वक्तशीर क्रमवारीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील केवळ ७०.९३ टक्के मेल-एक्स्प्रेस वेळेवर धावल्या आहेत. यामुळे वक्तशीरपणाच्या क्रमवारीत मध्य रेल्वे ५५व्या स्थानी गेले आहे, तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील ९४.९९ टक्के मेल-एक्स्प्रेस वेळेत धावल्या आहेत. यामुळे मुंबई सेंट्रल विभागाने क्रमवारीत आठवा क्रमांक मिळविला आहे.फाटक उघडे असणे, रेल्वे रुळांवरील अपघात या व अन्य कारणांमुळे मेल-एक्स्प्रेसला विलंब होतो, असे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे. कल्याण स्थानकात कसारा आणि कर्जत मार्गावर बहुतांश वेळा लोकल थांबवून मेल-एक्स्प्रेसला प्राधान्य देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने कसारा तिसºया आणि चौथ्या मार्गिकेचे काम त्वरित हाती घेऊन पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी केली आहे.‘बुलेट’ नंतर, आधीट्रेन वेळेत आणा!बुलेट ट्रेन चालविण्याचे स्वप्न पाहणाºया रेल्वे प्रशासनाने आधी मेल-एक्स्प्रेस वक्तशीरपणे चालविणे आवश्यक आहे. आठवड्यातून बहुतांश वेळा लोकल फेºया विलंबाने धावतात. विलंबाबाबत रेल्वे प्रशासन केवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देते. यामुळे बुलेटचे स्वप्न दाखविणाºया रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्यांसाठी असलेली मेल-एक्स्प्रेस वेळेत चालविण्याबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.- समीर झवेरी, रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते. 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेwestern railwayपश्चिम रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे