मुंबईत वाहन जळीतकांड, 11 दुचाकी, चारचाकी गाडया जाळल्या

By Admin | Updated: March 27, 2017 10:58 IST2017-03-27T08:23:15+5:302017-03-27T10:58:02+5:30

राज्यातील पुणे, नाशिकमध्ये असलेले वाहन जळीतकांडाचे लोण आता मुंबईत येऊन पोहोचले आहे.

In Mumbai, burnt vehicles, 11 bikes, four-wheelers were burnt | मुंबईत वाहन जळीतकांड, 11 दुचाकी, चारचाकी गाडया जाळल्या

मुंबईत वाहन जळीतकांड, 11 दुचाकी, चारचाकी गाडया जाळल्या

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - राज्यातील पुणे, नाशिकमध्ये असलेले वाहन जळीतकांडाचे लोण आता मुंबईत येऊन पोहोचले आहे. भांडूपच्या श्रीरामपाडा परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठया प्रमाणावर वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
भांडूपच्या श्रीरामपाडा परिसरात  11 दुचाकी आणि दोन चारचाकी वाहन जाळण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पार्किंगची जागा किंवा व्यक्तीगत वादातून वाहनांची जाळपोळ झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. जाळपोळीमुळे नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
 
मध्यरात्रीच्या सुमारास आगीचे लोळ दिसताच नागरीकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून असून वाहनमालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी पुणे, नाशिकमध्ये ब-याचवेळा अशा वाहन जळीतकांडाच्या घटना घडल्या आहे. आता हे लोण मुंबईत येऊन पोहोचले आहे. 
 
 

Web Title: In Mumbai, burnt vehicles, 11 bikes, four-wheelers were burnt