शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

मुंबई बॉम्बस्फोट : मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला आजन्म कारावास

By admin | Updated: April 6, 2016 12:21 IST

मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणातील दोषी मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. ६ - मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटांप्रकरणातील प्रमुख दोषी मुझम्मिल अन्सारी, फरहान खोत व वाहीद अन्सारीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर सिमीचे दहशतवादी साकीब नाचन, आतिफ मुल्ला यांना १० वर्षांच्या आणि अन्वर अली,मोहम्मद कमील, नूर मोहम्मद यांना २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष पोटा न्यायालयाने बुधवारी दुपारी हा निर्णय दिला. 
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ दरम्यान मुलुंड, मुंबई सेंट्रल, विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये १२ जण ठार तर १३९ लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांप्रकरणाची न्यायालयाने गेल्या आठवड्यात १० जणांना दोषी ठरवले तर तीन जणांची सबळ पुराव्याअभावी सुटका केली.
 
 
 हत्या, देशाविरुद्ध युद्ध छेडले...
 
तिन्ही बॉम्बस्फोटांचा एकच कट रचण्यात आल्याने या तिन्ही बॉम्बस्फोटांचा खटला एकत्रित चालवण्यात आला. सर्व आरोपींना हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध छेडणे व अन्य आयपीसी कलमांखाली तसेच आर्म्स अ‍ॅक्ट, रेल्वे अ‍ॅक्ट, एक्सप्लोसिव्ह सबस्टान्स अ‍ॅक्ट आणि पोटाअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. या सर्वांना कोणती शिक्षा द्यायची यावर बुधवारी सरकारी वकील रोहिणी सॅलियन व बचावपक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होईल.
 
सूड उगवण्यासाठी बॉम्बस्फोट
६ डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेंट्रल टर्मिनसमध्ये असलेल्या मॅकडोनल्ड रेस्टॉरंटमध्ये बॉम्बस्फोट झाला. दुसरा बॉम्बस्फोट २७ जानेवारी २००३ रोजी विलेपार्ले येथील भाजीबाजारात झाला. तर तिसरा बॉम्बस्फोट सीएसटी- कर्जत या लोकलमधील महिला डब्यात मुलुंड स्टेशनला झाला. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, या सर्व आरोपींनी बाबरी मशीद पाडल्याचा व गुजरात दंगलीचा बदला म्हणून हे बॉम्बस्फोट केले.
 
साकीब नाचन सूत्रधार 
स्फोटाचा सूत्रधार साकीब नाचन व लष्कर- ए- तोयबाचा पाकिस्तानी सदस्य फैझल खान यांनी २३ जणांसह हे बॉम्बस्फोट घडवले. या केसमधील पाच जणांचा खटल्यादरम्यानच मृत्यू झाला. तर पाच जण अद्याप फरारी आहेत. बॉम्बस्फोटासाठी मनुष्यबळ, दारुगोळा पुरवण्याचे काम नाचनने केल्याचा आरोप आहे.