शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Kishori Pednekar vs Deepak Kesarkar: "दीपक केसरकर उडते पंछी... इकडून उड तिकडे बस"; किशोरी पेडणेकरांची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:21 IST

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार, असा व्यक्त केला विश्वास

Kishori Pednekar vs Deepak Kesarkar: एकनाथ शिंदे यांनी सुमारे ४० आमदारांच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बंडखोरी केली आणि भाजपासोबत सत्तास्थापना केली. शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने त्यांच्यावर टीका करताना दिसले. त्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी  देखील शिंदे गटावर टीका केली. शिंदे गटाची भूमिका परखडपणे मांडणाऱ्या दीपक केसरकर यांनी त्यानंतर आदित्य ठाकरेंवर सौम्य शब्दांत टीका केली. परंतु, त्यांच्या टीकेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला.

आदित्य ठाकरे हे संजय राऊत यांची भाषा बोलू लागल्याची टीका दीपक केसरकर यांनी केली होती. या टीकेवर उत्तर देत असताना, किशोरी पेडणेकर प्रचंड संतापल्या. "दीपक केसरकर हे उडते पंछी आहेत, इकडून उड आणि तिकडे बस, तिकडून उड आणि इकडे बस असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे आमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकांना त्यांच्याबद्दल विचारु नका" अशा शब्दात किशोरी पेडणेकरांनी केसरकरांविषयी संताप व्यक्त केला.

शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या प्रवक्तेपदाची भूमिका स्वीकारली आहे. परंतु असे असले तरी किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. "जे आमच्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊ आणि घेणारच. आजच्या घडीला सगळेच आशावादी आहेत. काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत, पण आजही आम्ही त्यांच्याकडे (शिंदे गट) बंधुत्वाच्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे आशा बाळगण्यात काहीच गैर नाही. दीपाली सय्यद यांच्या मध्यस्थीने चांगलं काही घडणार असेल, तर चांगलंच आहे. पण आलात तर तुमच्यासोबत नाही तर तुमच्याशिवाय", असा निर्धार किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार!

"आम्ही सगळ्या लाटा, त्सुनामी पाहिल्या आहेत. त्या दर १५ वर्षांनी येतात. मी कोणाचं नाव घेत नाही. पण झालेली पडझड भरुन काढण्याची ताकद आम्हां शिवसैनिकात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे. मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकणार. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा भगवा फडकवणार", असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळDeepak Kesarkarदीपक केसरकर Kishori Pednekarकिशोरी पेडणेकरAditya Thackreyआदित्य ठाकरे