मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराचा मृत्यू
By Admin | Updated: December 18, 2015 00:51 IST2015-12-18T00:51:52+5:302015-12-18T00:51:52+5:30
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष गुन्हेगार शरीफ अब्दुल गफूर पारकर (८०) याचा गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराचा मृत्यू
नाशिक : मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतील सिद्धदोष गुन्हेगार शरीफ अब्दुल गफूर पारकर (८०) याचा गुरुवारी दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
पारकर हा नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात २०१३ सालापासून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. प्रकृती खालावल्याने कारागृह पोलिसांनी सकाळी ११ वाजता पारकरला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान दुपारी साडेबारा वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
पारकरची मुंबईच्या आॅर्थररोड कारागृहातून २०१३ साली नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. १० नोव्हेंबर २०१५ रोजी त्याला पक्षघाताचा झटका आला होता. त्यानंतर पारकरला मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. सुमारे महिनाभर त्याच्यावर उपचार सुरू होते. गेल्या शनिवारी (दि.१२) पारकरला रुग्णालयातून मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते.