शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ १५ निर्णय; मुंबई-ठाणे नवीन मेट्रो, लोकल ट्रेन खरेदी, पुणे-लोणावळा चौपदरीकरण मंजूर
2
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार; NCP ची तातडीची बैठक, राजकीय हालचाली वाढल्या
3
फिटनेस टेस्ट पास झाला! आता हा ठरू शकतो हिटमॅनच्या वाटेतील सर्वात मोठा अडथळा; इरफान पठाण म्हणाला...
4
किम जोंग उनची १२ वर्षांची मुलगी जगभरात चर्चेत! वडिलांसोबत चीनमध्ये का गेली किम जू?
5
Chanakya Niti: चाणक्यनीतीनुसार, संसारात 'या' पाच गोष्टी असतील तर नवरा बायकोचा घटस्फोट कधीच होणार नाही
6
'या' तीन देशांमधून भारतात येणाऱ्या अल्पसंख्याकांना पासपोर्टशिवाय राहण्याची परवानगी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
8
k Kavitha: वडिलांनी पक्षातून हाकललं, मुलीने आमदारकीवर लाथ मारली; बीआरएसमधील वाद टोकाला
9
बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार, कधी सुरू होणार; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
महागडी कार, लग्झरी फ्लॅट अन् बरेच काही...; श्रीमंतीच्या मायाजाळात कसा अडकतोय 'कॉमन मॅन'?
11
मध्यरात्री पीजीमध्ये शिरला मास्कमॅन; तरुणीचे हात-पाय बांधले अन्...; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
12
सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?
13
टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड
14
सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर
15
“मराठा आरक्षणात CM फडणवीसांचा सिंहाचा वाटा, लक्ष्मण हाकेंनी लुडबूड करू नये”: विखे-पाटील
16
भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात
17
Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल
18
ITR फाईल करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतच संधी! अन्यथा भरावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत दंड
19
"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट
20
“मनोज जरांगेंना अपेक्षित झालेले नाही, शेवटच्या क्षणी...”; वकील असीम सरोदेंचा मोठा दावा

आधी अहमदाबादला जाणारे विमान, नंतर मुंबई विमानतळ; बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पोलीस अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 13:56 IST

Bomb Threat: मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली.

मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची फोनद्वारे धमकी देण्यात आली. या फोननंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरूवात केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यलयाला १४ ते १५ वेळा फोन आला. सुरुवातीला मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या फोननंतर पोलिसांनी विमानतळ अधिकाऱ्यांना आणि इतर संबंधित विभागांना सतर्क राहण्यास सांगितले.

या फोननंतर पोलिसांनी तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळली नाही. त्यामुळे हा फोन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धमक्या देण्यासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल नंबरचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र