मुंबई : मिलन सबवेजवळ कारचा भीषण अपघात, ५ ठार
By Admin | Updated: August 18, 2016 11:21 IST2016-08-18T08:27:53+5:302016-08-18T11:21:55+5:30
मुंबईतील मिलन सबवे जवळ भरधाव वेगाने जाणारी कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात ५ जण ठार झाले आहेत. गुरूवारी सकाळी ही दुर्घटन घडली.

मुंबई : मिलन सबवेजवळ कारचा भीषण अपघात, ५ ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबईतील मिलन सबवे जवळ भरधाव वेगाने जाणारी कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघात ५ जण ठार झाले आहेत. गुरूवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये ४ पुरूष व एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरारोड येथील ही कार पहाटे पाचच्या सुमारास पश्चिम एक्स्प्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती फ्लोररा मार्बल दुकानासमोरील झाडावर आदळली. त्यामध्ये कारचालकासह पाच जण ठार झाले.
मुझ्झमिल मखतुर कनोजीया मु. (22वर्षे), राशिदा युसूफ शेख मु. (25 वर्षे) व जुनेद फकीर सोनी उर्फ शेख मु (22 वर्षे ) अशी मृतांची नावे असून अद्याप इतर दोघांची ओळख पटायची आहे. या अपघाताप्रकरणी चालक मुझ्झमिल कनोजीया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.