मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे
By Admin | Updated: November 30, 2015 19:13 IST2015-11-30T19:13:15+5:302015-11-30T19:13:15+5:30
अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे
ऑनलाईन लोकमत
पॅरिस, दि. ३० -
मुंबई - अतिरेक्यांचे नेहमीच लक्ष्य राहिलेल्या मुंबईसह राज्यातील नागपूर, नाशिक अणि इतर महत्वाच्या शहरात सीसीटीव्ही लावून संपूर्ण शहर सुरक्षित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तब्बल सात वर्षानंतर मुंबईत सीसीटीव्ही उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, यावेळी ते बोलत होते.
सीसीटीव्हीच्या पहिल्या टप्यात दक्षिण मुंबईत ४३४ ठिकाणी १३८१ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे जाळे निर्माण झाल्याने मुंबईची सुरक्षा अधिक वाढली असून अतिशय अत्याधुनिक आणि अद्ययावत असे याचे नियंत्रण कक्ष असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पहिला टप्पा सदोष असून गुणवत्तापूर्ण नसल्याची टिका केली आहे. या टिकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत. एल अँड टी कंपनीला १०० पेक्षा कमी सीसीटीव्ही बसविण्याचा अनुभव आहे आणि त्यांना केवळ निर्देशांकात ५७ टक्के गुण प्राप्त होऊनही निवड करण्यात आली, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मूळात हे काम कोणतीही एक कंपनी करत नसून, ते कन्सॉरटियम म्हणून होत आहे.