शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:42 IST

MBBS Student Dies By Suicide In Mumbai: ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहात ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक ताणतणावामुळे संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आला. 

रोहन रामफेर प्रजापती, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन हा जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील पाचव्या मजल्यावरील खोली क्रमांक १९८ मध्ये राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याच्या खोलीत छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी वसतिगृहातील विद्यार्थी आणि वर्गमित्रांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हाभारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. पण प्रत्येक समस्येचे निवारण होऊ शकते. कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील थोर आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र