मुंबई ढगाळ, विदर्भाला गारांचा इशारा
By Admin | Updated: April 9, 2015 01:51 IST2015-04-09T01:51:00+5:302015-04-09T01:51:00+5:30
मुंबईवरील धूळीच्या कणांचे प्रमाण कमी होत असतानाच पुढील ४८ तासांसाठी येथील आकाश अंशत: ढगाळ राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी

मुंबई ढगाळ, विदर्भाला गारांचा इशारा
मुंबई : मुंबईवरील धूळीच्या कणांचे प्रमाण कमी होत असतानाच पुढील ४८ तासांसाठी येथील आकाश अंशत: ढगाळ राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल आणि उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
बुधवारी सकाळीही मुंबईत ढगाळ हवामान नोंदविण्यात आले असून, दुपारी मात्र हे मळभ उतरल्याने येथे कडक उन्ह पडले होते.
राज्याचा विचार करता गेल्या चोवीस तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले
आहे.
दरम्यान, अमरावती व नांदेड जिल्ह्याला बुधवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला. अमरावतीत घराच्या छपराचे काम सुरू असताना वेगवान वाऱ्याने तोल जाऊन खाली पडलेल्या मजुराचा जागीच
मृत्यू झाला. तर नांदेड
जिल्ह्यातील महालिंगी येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. पावसामुळे आंबा, ऊस आदी पिकांचे नुकसान झाले़ (प्रतिनिधी)