मुलाच्या उमेदवारीसाठी आईने विकले मंगळसूत्र
By Admin | Updated: October 12, 2014 02:50 IST2014-10-12T02:50:59+5:302014-10-12T02:50:59+5:30
ग्रामपंचायतीपासून लोकसभेर्पयत सातत्याने तब्बल 30 निवडणुका लढवून पराभवाचा अनुभव पाठीशी असलेला उमेदवार उत्तम कांबळेला आहे.

मुलाच्या उमेदवारीसाठी आईने विकले मंगळसूत्र
>दोन ठिकाणांहून रिंगणात : ग्रामपंचायत ते लोकसभेच्या 3क् निवडणुका लढल्या
संजय भगत - महागाव (जि. यवतमाळ)
नक्कीच एक दिवस असा येईल की त्या दिवशी विधानसभा किंवा लोकसभेच्या दालनात मी दिसेल, अशी आशा ग्रामपंचायतीपासून लोकसभेर्पयत सातत्याने तब्बल 3क् निवडणुका लढवून पराभवाचा अनुभव पाठीशी असलेला उमेदवार उत्तम कांबळेला आहे. यंदा तर दोन ठिकाणांवरून निवडणूक लढविणा:या उत्तमला अनामत रक्कम भरण्यासाठी आईने मंगळसूत्र विकून पैसे दिले. मजुरी करणा:या या कुटुंबातील प्रत्येकाला मुलगा राजकारणात नाव कमावेल, अशी वेडी आशा आहे.
उत्तम भगाजी कांबळे हे नाव आता यवतमाळ जिल्ह्यातील सर्वपरिचित झाले आहे. निवडणूक कोणतीही असो उत्तम या निवडणुकीत उमेदवार असतोच. आतार्पयत त्याने 3क् निवडणुका लढविल्या आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा असो की लोकसभा उत्तम निवडणूक रिंगणात असतोच असतो. यावर्षी तर त्याने कमाल केली. पुसद आणि उमरखेड या दोन विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी दाखल केली आहे. उत्तमचे एम़कॉम. एलएलबीर्पयत शिक्षण झाले असून, प्रयत्न करूनही नोकरी न मिळाल्याने तो राजकारणात आला.
निवडणूक लढण्याची हौस असलेला उत्तम झोपडीवजा घरात राहतो. अनामत रक्कम जुळविण्यासाठी तो वर्षभर मोलमजुरी करतो. कामाच्या निमित्ताने तो मुंबईला असतो. परंतु निवडणूक आली की गावात येतो. मजुरीतून मिळविलेले पैसे अनामत रक्कम म्हणून भरतो.
या वेळेस दोन निवडणुकीत त्याला अर्ज दाखल करायचा होता. परंतु अनामत रकमेसाठी पुरेसे पैसे नव्हते. शेवटी मुलाचा हा हट्ट त्याच्या आईने पूर्ण केला. मुलासाठी या मातेने आपले मंगळसूत्रच विकले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तम यवतमाळ-वाशिममधून रिंगणात होता. त्यावेळी त्याची अनामत रक्कम जप्त झाली. मात्र, जनतेने त्याला 14 हजार 5क्क् एवढी मते दिली.