टेमघर धरणात मुलुंडचा विद्यार्थी बुडाला
By Admin | Updated: August 23, 2016 15:06 IST2016-08-23T15:05:57+5:302016-08-23T15:06:43+5:30
टेमघर धरण परिसरात सहलीसाठी आलेला एक तरुण धरणात बुडाला असून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह मंगळवारी बाहेर काढला

टेमघर धरणात मुलुंडचा विद्यार्थी बुडाला
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २३ - टेमघर धरण परिसरात सहलीसाठी आलेला एक तरुण धरणात बुडाला असून अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह मंगळवारी बाहेर काढला.
अनिमेष आशिष घोष (वय २१, रा. मुलुंड, मुंबई) असे त्याचे नाव आहे. हा तरुण सोमवारी सकाळी टेमघर धरणावर आला होता. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या घोष हा पाण्यात बुडाल्यावर त्याचा सोमवारी दुपारनंतर अग्निशमन दलातील जवानांनी शोध घेतला. परंतू त्याचा शोध लागला नव्हता. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने बचावकार्यात अडचण येत होती. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याचा मृतदेह दलाच्या जवानांनी पोहत जाऊन बाहेर काढला.
मुलाचे वडिल मोठे वैज्ञानिक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.