मुलुंडच्या डॉक्टरला १३ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 02:32 IST2017-04-25T02:32:52+5:302017-04-25T02:32:52+5:30

मुलुंड येथील एका डॉक्टरने बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या १३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा त्याच्या चालकाने हडपल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.

Mulund doctor gets 13 lakhs rupees | मुलुंडच्या डॉक्टरला १३ लाखांचा फटका

मुलुंडच्या डॉक्टरला १३ लाखांचा फटका

ठाणे : मुलुंड येथील एका डॉक्टरने बँकेत जमा करण्यासाठी दिलेल्या १३ लाख रुपयांच्या जुन्या नोटा त्याच्या चालकाने हडपल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला.
मुलुंड येथील फिर्यादी डॉक्टर त्यांचे मित्र पंकज उपासने आणि अतुल भानुशाली यांच्यासमवेत आॅक्टोबर २०१६ मध्ये नाशिक येथे गेले होते. नाशिकला जाण्यासाठी त्यांनी चालकास ठाण्यातील विवियाना मॉलसमोर बोलवून घेतले. तिथे बलदेव घाडीगावकर याला १३ लाख रुपये देऊन त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास डॉक्टरने सांगितले. चालकाने मात्र, ही रक्कम हडपल्याचा आरोप डॉक्टरने केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mulund doctor gets 13 lakhs rupees