मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी मराठी सिनेमा सक्तीचा
By Admin | Updated: April 7, 2015 17:26 IST2015-04-07T16:39:33+5:302015-04-07T17:26:39+5:30
मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी ६ ते ९ ) एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक झाले आहे.

मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी मराठी सिनेमा सक्तीचा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये (संध्याकाळी ६ ते ९ ) एक मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश काढला आहे. याशिवाय चित्रपटापूर्वी दादासाहेब फाळके यांच्यावरील सिनेमा दाखवणे बंधनकारक असणार आहे.
मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाइममध्ये मराठी चित्रपटांना जागा दिली जात नाही अशी ओरड गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मराठी सिनेनिर्माते व कलाकारांनी यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नवा आदेश काढून मल्टीप्लेक्स चालकांना दणका दिला आहे. यापुढे मल्टीप्लेक्समध्ये संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत एक स्क्रीन मराठी सिनेमासाठी राखीव ठेवावी लागेल. तर राज्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चित्रपट दाखवण्यापूर्वी दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रफित दाखवणे बंधनकारक असेल अशी घोषणा विधानसभेत केली.
राज्य सरकारच्या या निर्णयावर बॉलीवूडमधील निर्मात्यांनी नाराजी व्यक्ती केली आहे. सोशल मिडीयावरही सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे.