गाजर दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘मुळा’ भेट

By Admin | Updated: June 23, 2017 02:33 IST2017-06-23T02:33:05+5:302017-06-23T02:33:05+5:30

सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक

The 'Mula' visit to Chief Minister, who displayed carrot | गाजर दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘मुळा’ भेट

गाजर दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ‘मुळा’ भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीला अनेक निकष लावत शेतकऱ्यांना गाजर दाखविल्याचा आरोप करीत नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कुरियरने मुळा पाठवून रोष व्यक्त केला आहे.
सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून आंदोलन पुकारले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सुकाणू समितीबरोबर चर्चा करून कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची कार्यवाही न करता घोळ घातला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमधून निर्माण झाली आहे.

Web Title: The 'Mula' visit to Chief Minister, who displayed carrot