चिखले समुद्रकिनारी दोन मृत डॉल्फिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 20:26 IST2016-09-04T20:26:05+5:302016-09-04T20:26:05+5:30
डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनाऱ्यावर वडकती येथे रविवार, 4 सप्टेंबर रोजी दोन मृत डॉल्फिन आढळले आहेत.

चिखले समुद्रकिनारी दोन मृत डॉल्फिन
अनिरुद्ध पाटील/ऑनलाइन लोकमत
बोर्डी दि. ४ - डहाणू तालुक्यातील चिखले गावच्या समुद्रकिनाऱ्यावर वडकती येथे रविवार, 4 सप्टेंबर रोजी दोन मृत डॉल्फिन आढळले आहेत. गेल्या वर्षी या काळातच मासेमारी हंगामाच्या प्रारंभी आठ मृत डॉल्फीन आढळल्याने एकच खळबळ माजली होती. त्यावेळी डहाणू उपवन संरक्षकांच्या देखरेखी खाली मृत डॉल्फिनची विल्हेवाट लावण्यात आली होती.
दरम्यान आज आढळलेल्या दोन्ही डॉल्फिनच्या मांसाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडण्यास सुरुवात केल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अर्जुन वळवी या स्थानिकाने लोमतला माहिती दिल्यानंतर बोर्डी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले आहे. दोन दिवसानंतर दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन किनाऱ्यावर करण्यात येणार आहे.
शिवाय स्थानिक मच्छीमार आणि समुद्रावर व्यायामाला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊ नये या करीत वन विभागाने तात्काळ पाऊल उचलणे आवश्यक आहे.