आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढेल : पंकजा

By Admin | Updated: April 29, 2016 02:29 IST2016-04-29T02:29:27+5:302016-04-29T02:29:27+5:30

आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढणार आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

As much as the trauma will increase my strength: Pankaja | आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढेल : पंकजा

आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढेल : पंकजा

पाथर्डी : माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. मात्र आघात कराल तेवढी माझी शक्ती वाढणार आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
तालुक्यातील फुंदे टाकळी येथे गहिनीनाथ गडाच्या ८४ व्या नारळी सप्ताहास मुंडे यांनी गुरुवारी भेट दिली. राजकारणात मी आले ते वडिलांचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून. भगवानगडाने मला कन्या म्हणून वागवले आहे. एकदा छत्र दिल्यानंतर ते काढून घ्यायचे नसते, असे मुंडे यांनी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांचे नाव न घेता सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: As much as the trauma will increase my strength: Pankaja