शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

एसटी बंद, चर्चेच्या फेऱ्या मात्र सुरू; संपामुळे प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 07:31 IST

माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून एसटी सेवा मात्र बंद आहे.

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात कर्मचारी कुटुंबीयांसह ठाण मांडून बसले आहेत. राज्यात बहुसंख्य ठिकाणी एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून एसटी सेवा मात्र बंद आहे.यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्त सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे उपस्थित होते. तर कामगारांच्या शिष्टमंडळात सविता पवार, दिलीप घोडके, शरद कोष्टे, विनित फडके, सतीश मेटकरी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.बैठकीनंतर परब म्हणाले की, कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे. वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर चर्चा करू, असे सांगितले होते. एसटी सेवा तोट्यामध्ये चालवण्याची महामंडळाची इच्छा नाही. त्यासाठी उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विलीनीकरणाबाबत समितीला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मक दाखवली आहे. अजून संप मागे घेतलेला नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.७१ एसटी धावल्याशुक्रवारी १,५०० तर शनिवारी ३,००० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. शनिवारी ७१ एसटी धावल्या, त्यातून सुमारे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला. 

टॅग्स :state transportएसटी