शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एमएस-सीआयटी अभ्यासक्रमाचे रूपडे पालटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:14 IST

संगणकाचे प्राथमिक शिक्षण मानल्या जाणाºया एमएस-सीआयटी या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल केल्याची घोषणा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीने सोमवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बदलत्या गोष्टींचा समावेश करून अ‍ॅप्लिकेशनमध्ये मूलभूत बदल करत, एमएस-सीआयटी नव्या रुपात समोर आणल्याचे कंपनीने या वेळी स्पष्ट केले.

मुंबई - संगणकाचे प्राथमिक शिक्षण मानल्या जाणाºया एमएस-सीआयटी या अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल केल्याची घोषणा महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) कंपनीने सोमवारी प्रेस क्लबमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील बदलत्या गोष्टींचा समावेश करून अ‍ॅप्लिकेशनमध्ये मूलभूत बदल करत, एमएस-सीआयटी नव्या रुपात समोर आणल्याचे कंपनीने या वेळी स्पष्ट केले.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नव्या एमएस-सीआयटीमध्ये संगणकातील नव्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे खºया अर्थाने प्रशिक्षणार्थींना आयटी साक्षर होता येईल. पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये नव्या स्किल्सचा समावेश केला आहे. त्यात ‘तुम्ही बोलत राहा आणि संगणक टाईप करेल’, अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा?, अ‍ॅनिमेशन आणि गेमसाठी आवश्यक सोपी व्हिज्युअल प्रोग्रॅमिंग टूल्स, आॅनलाइन अ‍ॅप्लिकेशन्स भरण्याची योग्य पद्धत, आॅनलाइन प्रक्रियेतून आधार कार्ड किंवा जन्मप्रमाणपत्र कसे काढायचे व त्यासाठी आॅनलाइन प्रक्रिया कशी पूर्ण करायची, गुगल मॅप सर्चिंग अशा सर्वच बाबींचा नव्या प्रशिक्षणात समावेश आहे. यासह दैनंदिन जीवनातील मोबाइल अ‍ॅप्लिकेशन्स व विविध संकेतस्थळांचीही माहिती या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आहे.या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये ‘चर्चात्मक वास्तव’ या घटकाचा समावेश केला आहे. त्यात माहितीपर व्हिडीओचाही समावेश आहे. याशिवाय, इंग्रजी संभाषण कौशल्याचा समावेशही करण्यात आला आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकMaharashtraमहाराष्ट्र