शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष महोदय, ‘त्या’ शेतकऱ्यांनी मग काय करावं? कांदाप्रश्नी धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 06:03 IST

पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १७ गोण्या कांदा विक्रीसाठी अहमदनगर येथील बाजार समितीत नेला. ८४४ किलो कांद्याचे वजन भरले आणि हातात एक रुपयाचा ठोकळा आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी समोर आणले होते. लगेच शुक्रवारी अधिवेशनात आ.धनजंय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत जर हातात रुपया मिळत असेल तर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी काय करावं, असा प्रश्न उपस्थित केला.

  कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर आता नाफेडने खरेदी सुरू केल्याचा बनाव सरकार करत आहे. मात्र, राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये २० हजार टन कांद्याची आवक झाली असताना नाफेडने केवळ २०० टन कांदा खरेदी केल्याचे सांगत मुंडे यांंनी सरकारच्या दाव्यालाच आक्षेप घेतला आहे. पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते. 

बीड जिल्ह्यातील कडा येथील शेतकरी नामदेव लटपटे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी १७ गोण्या कांदा विकल्यांनंतर त्याला १ रुपया मिळाला होता, ती पावतीच मुंडे यांनी विधानसभेत दाखवली. 

अटलजींची कविता आणि मुंडेंचे चिमटेसुमारे साडेसहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा अभ्यास केल्यास कळते की, भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना तब्बल ८७ टक्के निधी देण्यात आला आहे, तर मुख्यमंत्री यांच्यासहित शिंदे गटाचे आमदार मंत्री असलेल्या विभागांना केवळ १३ टक्के निधी देण्यात आला आहे. यावरून कोणाच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज येतोच, असा टोलाही मुंडे यांनी लगावला. यावेळी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना उद्देशून मुंडे यांनी अटलजींची “छोटे मन से कोई बडा नहीं होता, और टूटे मन से कोई खडा नहीं होता”, या ओळी म्हणत चिमटे काढले. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेonionकांदाvidhan sabhaविधानसभा