शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष महोदय, बसायचे कुठे सांगा! पहिल्याच दिवशी ठाकरे गटाची वणवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 06:24 IST

नार्वेकर म्हणाले, आधी पत्र आणा; विधिमंडळ कार्यालयावरून पुन्हा संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाला कार्यालयासाठी वणवण करावी लागली. शिवसेना नाव व चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतले आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षांना याबाबत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून विनवणी करण्यात आली. मात्र, त्यांनी लेखी पत्र आल्यावरच विचार करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सध्यातरी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातच ठाकरे गटाला कार्यालय थाटावे लागले आहे.

शिंदे-ठाकरे गटांतील पक्ष वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत शिवसेना एकच असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कार्यालयाची मागणी कोणत्या आधारावर करायची या गोंधळात नेते आणि आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षांसोबत विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीदरम्यान कार्यालय देण्याची विनंती करण्यात आली. 

लेखी पत्रानंतरच विचार करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी घेतली. त्यानंतर ठाकरे गटाच्या सर्व बैठका दानवे यांच्या कार्यालयातच पार पडल्या.

ठाकरे गटासमोरील पेचn विधानसभा अध्यक्षांकडे लेखी पत्र दिले तर शिवसेनेचे आधीचे कार्यालय आमचे नाही, त्याचप्रमाणे पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट होऊन आपण वेगळा गट असल्याचा पुरावाच अध्यक्षांच्या हातात जाईल, असे ठाकरे गटाला वाटते. n आमदार अनिल परब यांनी आम्ही कार्यालयाची मागणी करणार नाही. शिवसेना एकच असून, कोणताही गट नाही. सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देईल तेव्हा योग्य न्याय मिळेल, अशी भूमिका मांडली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन