MPSC चा निकाल जाहीर, अभयसिंह मोहिते राज्यात पहिला
By Admin | Updated: April 5, 2015 18:54 IST2015-04-05T18:31:35+5:302015-04-05T18:54:31+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून सोलापूरमधील अभयसिंह मोहिते राज्यात पहिला आला आहे.

MPSC चा निकाल जाहीर, अभयसिंह मोहिते राज्यात पहिला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून सोलापूरमधील अभयसिंह मोहिते राज्यात पहिला आला आहे. मुलींमध्ये वनश्री लाभसेटवार ४२५ गुणांसह राज्यात पहिली आली आहे. तर विशाल साकोरे या तरुणाने ओबीसी प्रवर्गात अव्वल क्रमांक गाठला आहे.
एमपीएससी स्पर्धेचा निकाल रविवारी संध्याकाळी जाहीर झाला. सोलापूरमधील अभयसिंह मोहिते ४७० गुणांसह राज्यात पहिला आला आहे. समाधान शेंडगे ४६६ गुणांसह दुसरा तर विशाल साकोरे व प्रशांत खेडेकर हे ४६३ गुणांसह संयुक्तरित्या तिस-या स्थानावर आहेत. अभयसिंह मोहितेने तिस-या प्रयत्नात एमपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले. सांगलीतील महाविद्यालयातून इंजिनियरिंगची पदवी घेतलेल्या अभयसिंहचे पदव्यूत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले. सध्या विक्रीकर निरीक्षक, असिस्टंट ब्लॉक ऑफीसर या पदावर निवड झाल्यावर अभयसिंहने अथक मेहनत घेत एमपीएससीत अव्वल नंबर गाठले. मेहनत व प्रयत्नांवर विश्वास ठेवा असा सल्लाही अभयसिंहने एमपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान, एमपीएससीचा निकाल जाहीर झाला असला तरी एमपीएससीचे संकेतस्थावर निकाल बघताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.