शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

एमपीएससीचा 'मोठा निर्णय'; उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवारांच्या प्रोफाईलवर प्रसिद्ध करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2020 2:40 PM

उमेदवारांनी संबंधित परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये या दृष्टीने एक पाऊल उचलले आहे. 

पुणे :  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या सर्व परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आता पेपर तपासणीनंतर मिळालेल्या गुणांसह मूळ उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवारांना त्यांच्या प्रोफाइलवर उपलब्ध करून देणार असल्याचे प्रसिध्द पत्रकातून जाहीर केले आहे.  

उमेदवाराला मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज,  निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण , उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा अशी एकूण माहिती दिली जाणार आहे.  

    उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करुन देण्यात येते. त्यापैकी भाग -१ ( मूळ प्रत ) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग -२ (कार्बन प्रत ) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे. एमपीएससीकडुन परीक्षा होताच काही दिवसांनंतर उत्तर पत्रिका जाहीर केली जाते. त्यावरून उमेदवार त्यांच्या जवळ उपलब्ध असलेल्या कार्बन प्रतीवर गुणांचा अंदाज बांधता येत होता.  निकालानंतर मूळ प्रत पाहता येत नव्हती. आता मात्र ती पाहता येणार असून पारदर्शकता अधिक वाढणार आहे.      एमपीएससीच्या नियमानुसार,  उमेदवाराने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तरपत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे दिलेल्या सूचनांनुसार नोंदविणे ( वर्तुळ छायांकित करणे ) गरजेचे आहे . उत्तरपत्रिकेच्या भाग -२ ( कार्बन प्रत ) वरुन उमेदवारास त्याने संबंधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या उत्तरतालिकेवरुन पडताळून पाहता येतात . त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो . उमेदवारांना त्यांनी संबंधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये.  याकरीता एमपीएससीने संबंधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करुन देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दि. १ ऑक्टोबर  नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा , मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांकरीता लागू राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी