शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी : नवा पॅटर्न २०२५ पासून लागू करा, मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे आयोगाला विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 08:42 IST

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला केली आहे. 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षेचा नवा पॅटर्न २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला केली आहे. 

परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. हा नवा पॅटर्न २०२३ पासून लागू केला जाणार आहे. मात्र, यानुसार तयारीसाठी वेळ मिळणार नसल्याने उमेदवारांनी याला जोरदार विरोध केला. पुण्यात यासंदर्भात उमेदवारांनी आंदोलन केल्यानंतर याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही विनंती केली. आयोग यावर तातडीने निर्णय घेऊन लाखो तरुण-तरुणींना दिलासा देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.

एमपीएससी अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील अनुशेष कमी करण्याचे काम वेगाने केले आहे. नोकऱ्यांमधील ७५ हजार रिक्त पदे भरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचे नियोजनही झाले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्र्यांचेही  फाेनवर आश्वासनपुणे : मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने (डिस्क्रिप्टिव्ह) २०२५ नंतर घेण्याबाबत राज्य सरकार अनुकूल असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शहरातील टिळक चौकात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे