मुंबई : देशात राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे नियोजन राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून करण्यात आले. यासंबंधी तीन जुलैलाच सूचना जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे दुसरीकडे त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची परीक्षा होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा याच दिवशी घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता २० सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.देशभरातील परीक्षा केंद्रांवर १३ सप्टेंबरला इन्स्ट्यिूट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस)ची परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया बहुतांश विद्यार्थ्यांनी ‘आयबीपीएस’ परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची एक संधी हुकणार हे निश्चित झाले होते. तसेच त्याच दिवशी देशपातळीवरील ‘नीट’ ही राष्ट्रीय पात्रता व प्रवेश प्रक्रिया असल्याने परीक्षा केंद्राची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होणार नाही. या व अन्य अडचणी लक्षात घेता आयोगानेच प्रशासकीय कारणास्तव राज्य सेवा पूर्वपरीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे.
एमपीएससी परीक्षा आता २० सप्टेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 05:28 IST