शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएससी'कडून कोरोना पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याबाबतची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 17:53 IST

उमेदवारांना या नियमावलीचे काटेकोर पालन करणे असणार बंधनकारक..

ठळक मुद्देउमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संकेतस्थळावर नियमावली जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संकेतस्थळावर नियमावली जाहीर केली आहे. उमेदवारांनी या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.    परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (मास्क) परिधान करणे सक्तीचे आहे. परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी हात सतत सनिटाईझ करणे आवश्यक आहे. कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना याची पूर्वकल्पना द्यावी. उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे. उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा किंवा अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी. दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य आदी वापरण्यास उमेदवारांना सक्ती आहे.  परीक्षा उपकेंद्रावरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे.     प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास तसे आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविले जाईल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सनिटाईझ पाऊच, आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील कचरापेटीतच टाकावेत. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन एमपीएससीने केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या