शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएससी'ने परीक्षा पुढे ढकलल्याची केली घोषणा; तारखा जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांची मात्र निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 18:39 IST

एमपीएससीने 2 स्प्टेंबर रोजी अधिकृत घोषणा केल्यामुळे परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला.

ठळक मुद्देआता पुन्हा नवीन तारखांची वाट पाहावी लागणार

पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात ट्विट केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.मात्र,बुधवारी एमपीएससीने सुध्दा संकेतस्थळावर परीक्षेबाबत अधिकृत घोषणा केल्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. परंतु,परीक्षांच्या सुधारीत तारखा जाहीर न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीशी निराशा आहे.     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाच्या विविध परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. आयोगाने प्रसिध्द केल्या वेळापत्रकानुसार २० सप्टेंबर रोजी घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.त्याचप्रमाणे दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुद्धा पुढे ढकलली असून या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावामुळे मुख्यमंत्री कार्यालयाने एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय व्टिटरवरून जाहीर केला.परंतु,परीक्षा पुढे ढकलण्याचे अधिकार एमपीएससीकडे असताना मुख्यमंत्री कार्यालयाने 26 आॅगस्ट रोजी याबाबत घोषणा केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.तसेच आयोगाने अधिकृत घोषणा न केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती होती.मात्र, एमपीएससीने 2 स्प्टेंबर रोजी अधिकृत घोषणा केल्यामुळे परीक्षेबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा पडला.  ----------------- मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केलेल्या निर्णयाला एमपीएससीने केवळ दुजोरा दिला आहे. नवीन तारखा जाहीर होतील,अशी अपेक्षा होती. मात्र,तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये निराशा आहे.सातत्याने परीक्षा पुढे ढकलल्या जात असल्यामुळे अभ्यासाचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.- सुहास कांबळे, स्पर्धा परीक्षार्थी.

.............    राज्य सेवा पूर्व परीक्षा एमपीएससीच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल,असे वाटले होते.त्यामुळे घरच्यांचा विरोध पत्कारून गाव सोडून पुण्यात परीक्षा देण्यासाठी आलो. कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात राहणे धोक्याचे वाटत असून नवीन तारखा जाहीर न झाल्याने निराशा झाली आहे. आता पुन्हा नवीन तारखांची वाट पहावी लागणार आहे. महेश चोबे, स्पर्धा परीक्षार्थी.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMPSC examएमपीएससी परीक्षाState Governmentराज्य सरकार