शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 14:03 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी केले होते.

NCP SP Group MP Supriya Sule News: आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दुसरीकडे काका-पुतण्या एकत्र येण्याबाबतही अनेक कयास बांधले जात आहेत. राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, मविआत सामील होणार, याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याबाबत आशावादी आहेत. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. 

पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. तर काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांमध्ये एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत. पत्रकारांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. 

आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, हा माझा निर्णय नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातच शरद पवार यांच्या कामांची पद्धत तुम्ही सर्वांनी सहा दशके पाहिली आहे. शरद पवार जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळे जो पक्षाचा निर्णय असेल तो निर्णय पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे असेल तोच निर्णय पक्ष घेईल. आम्ही कोणताही निर्णय वैयक्तिक घेत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही जातोच, एकत्र येतोच. आमची विचारधारा वेगवेगळी जरी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून जिथे कुठे सुख आणि दु:खामध्ये आपण नेहमी एकमेकांच्या बरोबर असतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार