खासदार पुत्र मैदानात
By Admin | Updated: February 7, 2017 23:57 IST2017-02-07T23:57:57+5:302017-02-07T23:57:57+5:30
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण यंदा उमरगा तालुक्यातील कुन्हाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित असून, त्यांची लढत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संताजी

खासदार पुत्र मैदानात
उस्मानाबाद : खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण यंदा उमरगा तालुक्यातील कुन्हाळी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवित असून, त्यांची लढत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य व काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांच्याशी आहे.
लातुरातील औशाचे विधानसभा सदस्य बसवराज पाटील यांचे पुत्र शरण उमरगा तालुक्यातील आलुर गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणूक मैदानात उतरले आहेत. तसेच तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र बाबूराव चव्हाण हे तुळजापूर तालुक्यातील अणदूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे अॅड. दीपक आलुरे, भाजपाचे अॅड. पंडित घुगे व शिवसेनेचे संजय भोसले यांच्याशी होत आहे.