खासदार पुत्राच्या वाहनावर दुचाकीस्वार धडकले!

By Admin | Updated: June 23, 2016 00:16 IST2016-06-23T00:16:10+5:302016-06-23T00:16:10+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील घटनेत दुचाकीस्वार जखमी.

MP sends a two-wheeler to the son's vehicle! | खासदार पुत्राच्या वाहनावर दुचाकीस्वार धडकले!

खासदार पुत्राच्या वाहनावर दुचाकीस्वार धडकले!

बुलडाणा : खासदार प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांच्या चारचाकी वाहनावर दुचाकीस्वार धडकल्याची घटना २२ जून रोजी दुपारी हतेडीजवळ घडली. या घटनेत दोन जण जखमी झाले. बुलडाणा येथे संजय गायकवाड यांच्या कार्यालयाला व कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन ऋषी जाधव हे औरंगाबादच्या दिशेने त्यांच्या चारचाकीने निघाले होते. दरम्यान, हतेडी येथील शिवाजी विद्यालयाच्या दिशेने जात असताना मागून भरधाव येणारी दुचाकी त्यांच्या वाहनावर येऊन धडकली. यात त्यांच्या गाडीचा मागचा काच पूर्णत: फुटला, तर दुचाकीस्वारही जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना ऋषी जाधव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणले. जखमींमध्ये एकनाथ साहेबराव चेके (वय ३७) व तानाजी पुंडलिक चेके (वय ३५) रा. सरंबा यांचा समावेश आहे.

Web Title: MP sends a two-wheeler to the son's vehicle!