शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:50 IST

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

नवी दिल्ली - शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चालले असते. सरकार ७२ तासांत कोसळले नसते. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय बोलू? अलीकडे त्यांची वक्तव्ये पाहतोय. फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधी ८ आश्चर्य आहेत. २ आश्चर्य दिल्लीत बसलेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, माणसाने किती खोटे बोलावे. मूळात तुम्ही विश्वासघात केल्यामुळे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचं भाष्य केले होते. अमित शाह यांच्यासमोर सत्तेचे वाटप ५०-५० टक्के झाले होते. विश्वासघात त्यांनी केल्यामुळे आता गळा काढण्यात काय अर्थ आहे? पहाटेच्या शपथविधीतून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी जो ४० आमदार बाहेर पडून सूरत-गुवाहाटीमार्गे परतले आणि त्यानंतर शपथविधी झाला तो शरद पवारांमुळेच झाला असंही सांगू शकतात असंही त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत एका वैफल्यातून ते बोलतायेत. महाराष्ट्रात त्यांच्या सरकारविषयी अत्यंत तिरस्कार आणि घृणा आहे. नागपूर-विदर्भात ते हरलेत. विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. कसबा, चिंचवड विधानसभेत त्यांचा पराभव दिसत आहे. त्यातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी विधाने करत आहेत असं सांगत राऊतांनी फडणवीसांवर शरसंधान साधले. 

दरम्यान, अजित पवार हे ठामपणे, मजबुतीने महाराष्ट्रात एक वातावरण निर्मिती करत आहेत. भाजपाविरोधात लढा देतायेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेचा शपथविधीने अजूनही फडणवीसांना दचकून जाग येते. त्यावर फडणवीसांनी उपचार करायला हवेत. राज्यातील वातावरण मिंदे-फडणवीसांविरोधात आहे. त्याचा परिणाम असल्याने अशी विधान देवेंद्र फडणवीस करत आहेत असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?“२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा