शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:51 IST

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले, असे सांगत संजय राऊतांनी टीका केली.

Sanjay Raut News: समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची जी दहा लक्षणे सांगितली आहेत, ती सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये दिसतात. एकनाथ शिंदे यांचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले आहे. कुणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत. ज्यांनी शिवसेनेचे तुकडे केले, पक्ष विकत घेतला आणि शिंदेच्या हातात सोपविला, अशा प्रवृत्तींशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही संबंध ठेवू नये हात मिळविणे करू नये अशी आमची भूमिका आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह आणि मोदी यांनी ठरवले आहे की, महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा संपवायचा. अमित शाह यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोरांचा पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्राच्या शत्रूशी कुणीही हात मिळविणी करू नये हेच आमचे मत आहे. अशा प्रकारे हात मिळविणी करणे ही महाराष्ट्राच्या हुतात्म्यांशी बेईमानी करणे असे आमचे मत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 

दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो

मुंबईतील अंधेरी परिसरात एका विवाह सोहळ्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तसेच त्यांनी एकमेकांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. मागच्या तीन महिन्यात कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेली ही तिसरी भेट आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते.

दरम्यान, दोन तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते ठाण्याचा दौरा करतील.  शिवसैनिकांचे प्रश्न समजून घ्यावे पदाधिकाऱ्यांशी चर्चा कराव्या यासाठीच हा दौरा असणार आहे. पालघर ,कोकण ठाणे या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पूर्वी विभागीय शिबिर शिवसेनेची होत होती. त्याची सुरुवात आम्ही मुंबईपासून करत आहोत. नऊ मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आम्ही कालिदास सभागृहात घेऊ. दिवसभराची ही शिबिर असतील मराठ्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशी शिबिर करण्याची योजना आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे