शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

'३७० विधेयक संसदेत आणले गेले, तेव्हा...'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 15:15 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत केले आहे.

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७०(Jammu-Kashmir Article 370) हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

पुण्यात संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. जेव्हा हे विधेयक संसदेत आणले गेले तेव्हा आम्ही पाठिंबा दिला. तिथे निवडणुका व्हाव्यात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, त्या निर्णयाचे मी स्वागतही करतो. तिथल्या जनतेला त्यांचे सरकार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं संजय राऊतांनी यावेळी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे उद्धव ठाकरेंनी स्वागत केले. तसेच, देशात सध्या गॅरंटी देण्याचं काम सुरूय, सगळ्या गोष्टींची गॅरंटी दिली जात आहे. मग, कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाचे शिवसेनेनं यापूर्वीही स्वागत केलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचेही आम्ही स्वागत करतो. मात्र, न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमधील निवडणुका घ्याव्यात, त्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरही आपल्या ताब्यात घ्यावा आणि एकत्रितपणे सर्व निवडणुका घ्यावात. म्हणजे, देशवासीयांना आनंद होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. तसेच, आता काश्मीरमधून दूर गेलेले काश्मिरी पंडित, पुन्हा काश्मीरमध्ये येऊन राहतील का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच, देशभरात विखुरलेले ते काश्मिरी पंडित परत येतील का, आणि निवडणुकीत मतदान करतील का, मोकळ्या वातावरणात जम्मू-काश्मीरच्या विधानसभेसाठी मतदान करतील काय, याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी देतील का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.  

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. PM मोदींनी आज #NayaJammuKashmir हॅशटॅगसह ट्विट केले की, 'कलम ३७० रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक असून, या निर्णयामुळे संसदेने ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या कायम राहील, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 'आजचा निर्णय म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या लोकांसाठी नवी आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ ज्ञानाने एकतेचे मूलतत्त्व बळकट केले, जे एक भारतीय म्हणून आपण सर्वांपेक्षा प्रिय आणि मोठे आहे. मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. 

४ वर्षे ४ महिन्यांनी आला निकाल

संसदेने ५ ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं होते. त्याचसोबत राज्यात विभागणी करत जम्मू काश्मीर आणि लडाख वेगळे केले होते. ही दोन्ही राज्ये केंद्रशासित बनवली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात २३ याचिका आल्या होत्या. या सर्व याचिकांवरील सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. तो निकाल सरन्यायाधीशांनी आज सुनावला. केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर जवळपास ४ वर्ष ४ महिने आणि ६ दिवसांनी सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला.  सुप्रीम कोर्टातील ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या खटल्यावर सुनावणी झाली होती. त्यात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. बी.आर गवई, न्या. सूर्यकांत  यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Article 370कलम 370Sanjay Rautसंजय राऊतJammu Kashmirजम्मू-काश्मीर