शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

"प्रतिभा पाटील यांची जमीन लाटली", राऊतांचा मंत्र्यावर गंभीर आरोप, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी परवाना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:53 IST

खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर माजी राष्ट्रपतींची जमीन हडपल्याचा आरोप केला

Sanjay Raut on Jayakumar Rawal: खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. शंभर दिवसांत एक बळी गेला आहे, सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. त्यानंतर बोलताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यावरही गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन लाटण्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

सुप्रीय सुळे यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारमधील सात ते आठ मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वातावरण खराब केल्याचे म्हटलं. यावेळी  राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

"महाराष्ट्रात मंत्रिमंडळात अशी अनेक पात्रे आहेत ज्यांचे चेहरे आता समोर येत आहेत. धनंजय मुंडे यांचा बळी गेला. जयकुमार रावल यांनी रावल को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये कोट्यवधि रुपयांचे घोटाळे करुन ठेवले आहेत. कुटुंबातले खोटे कर्जदार तयार करुन कोट्यवधि रुपये लाटले. हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे. त्यांना मी विचारणार आहे की, तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का? जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहेत," असं संजय राऊतांनी म्हटलं.

"माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन या महाशयांनी लाटली. राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत यांची हिम्मत गेली. हायकोर्टाने या लुटमारीवर  आता ताशेरे ओढले आहेत. असे मंत्री या सरकारमध्ये आहेत. असे रावल एकटेच नाहीत. किमान सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचे वातावरण खराब केलं आहे. अशा मंत्र्यांचे बळी जाणारच. हे बळी घेण्यासाठी भाजपचेच लोक आम्हाला हत्यारं पुरवत आहेत त्यांचा मी आभारी आहे," असंही संजय राऊत म्हणाले.  मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपतींची जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील म्हटलं जात आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल २६ एकर जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलJaykumar Rawalजयकुमार रावलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस