शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर पडला 5 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा - खासदार राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 2:56 PM

" देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतकर्यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले", असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली.

 नंदूरबार- " देशात मोदी सरकार सत्तेत येऊन 4 वर्षे झाली, मात्र याच काळात शेतकर्यांचे डोक्यावरील कर्ज 5 लाख कोटीने वाढले", असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. धुळे जिल्हातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून सुरु  झालेली शेतकरी सन्मान्न यात्रा आज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली.जिल्ह्यातील शहादा, शिरपूर तालुक्यातील बामखेडा, वडाळी, फेस,वरुळ या गावांत ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ठिकठिकाणी खासदार शेट्टी यांनी स्थानिक प्रश्नांसह देशपातळीवरील समस्यांचा आढावा घेत भाजप आणि मोदी सरकारवर टीका केलीय.  शेट्टी म्हणाले, देशात जीएसटी नावाचे भूत शेतकर्यांच्या मानगुटीवर बसले आहे. नोटाबंदीने कंंबरडे मोडले, शेतीमालाचे नुकसान झाले, परिणामी शेतकरी उद्ध्वस्त झाला. थापाड्या मोदींनी केले तरी काय? उद्योगपतींच्या हातचे ते बाहुले बनले आहेत. शेतकरी मरणासन्न झालाय, त्याला आधार दिला जात नाही, म्हणून तो गळफास घेतोय. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारचीच आहे. शेतकर्यांनो आत्महत्या करू नका, उलट प्रश्न वाढतात, एकाही शेतकर्याने आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

देशातला आणि राज्यातला शेतकरी   विजय मल्ल्यांप्रमाणे पळपुटा नाही. तो स्वाभिमानी आहे. तो  बंड करून प्रस्थापितांची थडगी बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी नंदूरबार जिल्ह्यात शेतकरी सन्मान यात्रेचं ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले.  यावेळी प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, हंसराज वडगुले, रसिकाताई ढगे,राज्य प्रवक्ते अनिल पवार, विभागप्रमुख घनशाम चौधरी,गजानन बंगाळे पाटील, माणिक कदम, पुजाताई मोरे, शर्मिला येवले, अमोल हिप्परगे, रमेश भोजकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार