ही खासदार भ्रष्ट आहे, भाजपचेच दलाल आरोप करत होते; भावना गवळींवरून ठाकरेंची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 06:39 PM2023-07-09T18:39:31+5:302023-07-09T18:40:43+5:30

मी मुख्यमंत्री असताना पोहरादेवी विकासाचा जो आराखडा मंजूर केला होता, त्यावर सरकारच्या नाकात दम करून तो आराखडा राबविणार.- उद्धव ठाकरे

MP bhavana gawali is corrupt, BJP's brokers were alleging; Uddhav Thackeray's criticism of PM Modi over Bhavna Gawli Rakhi knot | ही खासदार भ्रष्ट आहे, भाजपचेच दलाल आरोप करत होते; भावना गवळींवरून ठाकरेंची मोदींवर टीका

ही खासदार भ्रष्ट आहे, भाजपचेच दलाल आरोप करत होते; भावना गवळींवरून ठाकरेंची मोदींवर टीका

googlenewsNext

मला एका गोष्टीची थोडी लाज वाटतेय. फडणवीसांसोबत पोहरादेवीला आलो होतो. विकास आराखडा दिला. लाखो लोक जमले होते. मी मुख्यमंत्री झालो. आराखडा मंजूर करून निधी दिला. निदान बांधकामाला वेळ लागेल पण रस्ता तरी नीट असेल. अजून रस्ता नीट नाहीय. मग केलत काय निधी गेला कुठे, त्यातही कोणी हप्ता खाल्ला. मी जो निधी दिला तो मधल्यामध्ये खाल्ला का याची चौकशी कोण करणार, असा सवाल ठाकरेंनी केला. 

मणिपूर शांत करायचे असेल तर मी उपाय सांगतो; उद्धव ठाकरेंनी फडणवीस, मोदींना लगावला टोला

आपल्या खासदार ताई पळाल्याच होत्या. एक दिवस फोटो आला पंतप्रधानांना राखी बांधताना. ही खासदार भ्रष्ट आहे असे आरोप भाजपाच्याच दलाल लोकांनी केले होते. तिच्या हातून मोदींनी राखी बांधून घेतली. ज्या ज्या शिवसैनिकांच्या ईडी, सीबीआयचे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे त्यांना मी सगळ्यांना पाठविणार आहे जा त्या दलालाच्या घरी जा, या लोकांवर असे काय शिंपडलेस की ते स्वच्छ दिसू लागले, असे ठाकरे म्हणाले. 

मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपा गेली तरी चालते. राष्ट्रवादीसोबत गेली तरी चालते पण शिवसेनेने जायचे नाही. हे भाजपाचे हिंदुत्व थोतांड आहे. आज या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या घराकडे पाहण्याचा वेळे नाहीय पण दुसऱ्यांची घरे तोडताय. हे हिंदुत्व मान्य आहे का? शेतकऱ्यांना वीज मिळत नाहीय, कायदा सुव्यवस्था मिळत नाहीय, महागाई वाढली आहे. फडणवीसांनी मी मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशमध्ये जाऊन महाराष्ट्रात वीज बिल माफ करून दाखवावी असे म्हटलेले. आमचे सरकार होते ते तीन चाकांचे सरकार होते. यांचे लगेच त्रिशुळ झाले. एवढे केंद्रात सरकार, महाराष्ट्रात सरकार मग शेतकऱ्यांचे विजबील का माफ करत नाहीत, असे आव्हान ठाकरे यांनी दिले. 

मी मुख्यमंत्री असताना जो आराखडा मंजूर केला होता, त्यावर सरकारच्या नाकात दम करून तो आराखडा राबविणार. त्यासाठी मला तुमचे आशिर्वाद हवे आहेत. माझ्याकडे देण्यासारखे काही नाहीए. तिकडे पैसा आहे, पक्ष आहे. चिन्ह आहे. मोदींनी कर्नाटकात हनुमानाचे नाव घेऊन मतदान करावे असे सांगितलेले. पण तो हनुमानदेखील त्यांना पावलेला नाहीय. मी अष्टभुजा, दशभुजा भवानीचे ऐकत होतो. पण सहस्त्र, लाखो भुजा असलेल्यांचा समुदाय पाहिलाय, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  


 

Web Title: MP bhavana gawali is corrupt, BJP's brokers were alleging; Uddhav Thackeray's criticism of PM Modi over Bhavna Gawli Rakhi knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.