शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:34 IST

cinema Kolhapur- मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुदत संपण्यापूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक होऊन तीत सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करणे अपेक्षित असताना ही बैठक बोलावण्यात आलेली नाही. कारण यात पुन्हा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार आहे.

ठळक मुद्दे अध्यक्षांवर पुन्हा अविश्वासाची टांगती तलवारकार्यकारिणी बैठकीची मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत आता संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुदत संपण्यापूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक होऊन तीत सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर करणे अपेक्षित असताना ही बैठक बोलावण्यात आलेली नाही. कारण यात पुन्हा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठरावाची टांगती तलवार आहे.चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत मार्चअखेर संपत असून, तत्पूर्वी कार्यकारिणीची अखेरची बैठक व्हावी लागते. या बैठकीत अहवाल सादर करून संचालकांची मान्यता घ्यावी लागते. त्यातच सर्वसाधारण सभेची तारीख जाहीर केली जाते. या सभेत सभासदांच्या मान्यतेने निवडणूक जाहीर होते अशी ही प्रक्रिया आहे. त्यानुसार आतापर्यंत या घडामोडी होणे अपेक्षित होते. पाच वर्षांपूर्वी २४ एप्रिलला मतदान व २७ एप्रिलला मतमोजणी व ५ मे रोजी नवी कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. मात्र, यापैकी कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही.निवडणुकीच्या दृष्टीने महामंडळाची कोणतीही तयारी अजून नाही. कार्यकारिणी बैठक, सर्वसाधारण सभा, निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्या तयार करणे, त्यावर हरकती, अंतिम यादी प्रसिद्धी, मतदान या प्रक्रियेसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी लागतो. संचालकांनी कार्यकारिणीच्या बैठकीची मागणी केली होती. त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही.धर्मादायकडे प्रशासकांची मागणी करणारमहामंडळाच्या जुन्या कार्यकारिणीतील १४ संचालकांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यमान संचालकांचा समावेश आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये त्रुटी असून, तो संचालकांना न दाखवताच धर्मादायला सादर करण्यात आल्याची माहिती आहे. यासह अन्य बाबींवरून संचालकांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे मुदत संपेपर्यंत कार्यकारिणीची बैठकच झाली नाही, तर धर्मादाय आयुक्तांकडे प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे.निवडणूक, मुदतवाढ किंवा प्रशासकमहामंडळाचे ३५ हजारांवर सभासद असून, ते राज्यभर आहेत, सध्या कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने निवडणुकीबाबत संदिग्धता आहे. कार्यकारिणीची बैठक झाली, तर संचालकांनी राजीनामा देऊन प्रशासक आणायचा किंवा अध्यक्षांवर अविश्वासदर्शक ठराव आणून नव्या अध्यक्षांची नियुक्ती करून सहा महिने मुदतवाढ घ्यायची, या दृष्टीने मुंबई, पुणे आणि कोल्हापूरच्या सभासदांच्या हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर