अबकारी कराविरोधात सराफांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

By Admin | Updated: March 29, 2016 13:33 IST2016-03-29T13:33:19+5:302016-03-29T13:33:19+5:30

सोन्याच्या दागिन्यांवर लावलेला वाढीव १ टक्का अबकारी कर मागे घेण्याच्या मागणीवर सराफ व्यवसायिक ठाम असून मंगळवारी रस्त्यावर उतरुन त्यांनी आंदोलन केलं आहे

Movement on the streets of Sarafa protest against abolishing the movement | अबकारी कराविरोधात सराफांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

अबकारी कराविरोधात सराफांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, २९ - सोन्याच्या दागिन्यांवर लावलेला वाढीव १ टक्का अबकारी कर मागे घेण्याच्या मागणीवर सराफ व्यवसायिक ठाम असून मंगळवारी रस्त्यावर उतरुन त्यांनी आंदोलन केलं आहे. सायन-पनवेल महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे हायवेवर रस्त्यावर उतरत सराफांनी आंदोलन केलं. सरफांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. देहूरोड पोलीस स्थानकाजवळही रास्ता रोको आंदोलन कऱण्यात आलं. अकोल्यातही सराफा व्यावसायिकांनी रेल रोको आंदोलन केलं. केंद्रानं लावलेला १ टक्के अबकारी कर अन्यायकारक असून त्यामुळे परमिट राज अस्तित्वात येईल त्यामुळे अबकारी कर रद्द करण्याच मागणी सराफ व्यवसायिक करत आहेत. 
 

Web Title: Movement on the streets of Sarafa protest against abolishing the movement