आंदोलनाची परवानगी नाकारली

By Admin | Updated: November 30, 2014 01:33 IST2014-11-30T01:33:39+5:302014-11-30T01:33:39+5:30

3क् नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

Movement permission denied | आंदोलनाची परवानगी नाकारली

आंदोलनाची परवानगी नाकारली

नागपूर : शेतक:यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवार, 3क् नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानापुढे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. पण या आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.
शेतक:यांना सरसकट कजर्माफी, वीज देयकात माफी आणि शेतक:यांसाठी ‘मार्शल प्लॅन’ आदी मागण्या शेतकरी संघटनेच्या आहेत. शुक्रवारी यासंदर्भात नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद जोशी यांच्यात ‘रामगिरी’वर चर्चा झाली होती. पण त्यातून तोडगा निघाला नाही. त्यामुळे रविवारी  मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापुढे  शेतकरी ठिय्या आंदोलन करतील, असे शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी सांगितले. दरम्यान ठिय्या आंदोलन, मोर्चा व ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. पण ती नाकारण्यात आली आहे, असे नवले यांनी सांगितले. सरकारच्या दडपशाहीचा संघटनेने निषेध केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Movement permission denied