धनगर आरक्षणासाठी गुजरातमध्ये आंदोलन
By Admin | Updated: April 3, 2017 05:53 IST2017-04-03T05:53:46+5:302017-04-03T05:53:46+5:30
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, म्हणून धनगर आरक्षण संघर्ष समितीने पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला

धनगर आरक्षणासाठी गुजरातमध्ये आंदोलन
मुंबई : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, म्हणून धनगर आरक्षण संघर्ष समितीने पंतप्रधानांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनापर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर पंतप्रधानांच्या गुजरात येथील घराबाहेर आंदोलनाचा इशारा समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिला आहे.
पाटील म्हणाले की, मोदी यांच्या मातोश्रींसोबत अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्याचा समितीचा प्रयत्न आहे. यामुळे धनगर आरक्षणाच्या प्रश्नाला वाचा फुटेल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)