दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन
By Admin | Updated: November 2, 2014 00:44 IST2014-11-02T00:44:06+5:302014-11-02T00:44:06+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा गावातील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. युनिव्हर्सिटी कम्युनिटी फॉर डेमोक्रेसी अॅण्ड इक्वॉलिटी आणि इतर संघटनांनी शनिवारी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले. तर काँग्रेसतर्फे घाटकोपर हायवे येथे तर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीने चेंबूर नाका परिसरात बंद पाळला.
दलित हत्याकांडातील हत्या:यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी शनिवारी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले. या आंदोलनात रिपाइं नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शेकडो कार्यकत्र्यानी सहभाग घेतला. धरणो आंदोलनानंतर कार्यकत्र्यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हत्या:यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हत्या:यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
घाटकोपर येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना भाजपावर टीका केली. राज्यात दलितांवर अत्याचार होत असताना भाजप नेते शाही सोहळ्य़ात मश्गूल असल्याची टिका त्यांनी केली.
तसेच चेंबूर येथे अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने चेंबूर नाका परिसरात शनिवारी बंद पाळण्यात आला. यावेळी कार्यकत्र्यानी दुकाने बंद करण्याची सक्ती केली. सकाळी या परिसरात बंदमुळे काही दुकाने काही तासांसाठी बंद होती. (प्रतिनिधी)