नवी मुंबई विमानतळासाठी करणार डोंगराचे सपाटीकरण

By admin | Published: August 22, 2014 02:15 AM2014-08-22T02:15:23+5:302014-08-22T02:15:23+5:30

नवी मुंबई विमानतळासाठी एक अख्खा डोंगर सपाट करण्यात येणार आहे. चार टप्प्यांत होणा:या या कामासाठी सुमारे 1716 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

Mountain Stations for Navi Mumbai Airport | नवी मुंबई विमानतळासाठी करणार डोंगराचे सपाटीकरण

नवी मुंबई विमानतळासाठी करणार डोंगराचे सपाटीकरण

Next
नारायण जाधव - ठाणो 
नवी मुंबई विमानतळासाठी एक अख्खा डोंगर सपाट करण्यात येणार आहे. चार टप्प्यांत होणा:या या  कामासाठी सुमारे 1716 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण करण्याचा संकल्प सिडकोने सोडला आहे. 
विमानतळाच्या मार्गातील प्रमुख अडथळे वन आणि पर्यावरण खात्याने दूर केल्यानंतर आता सिडकोने कोणत्याही परिस्थितीत 2क्18र्पयत त्याचा पहिला टप्पा सुरू करण्याच्या हालचाली तीव्र केल्या आहेत. यानुसार, विमानतळाच्या 2272 हेक्टर जमिनीपैकी पेंदरमल डोंगरासह सुमारे 1164 हेक्टर जमिनीचे पूर्ण सपाटीकरण करून विकास करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आह़े त्यातील पहिला टप्पा- 253 कोटी, दुसरा- 252 कोटी, तिसरा- 6क्5 कोटी 3क् लाख आणि चौथा- 6क्5 कोटी 8क् लाख रुपयांचा असून, त्यासाठी इच्छुक कंत्रटदारांकडून सिडकोने निविदा मागवल्या असल्याची माहिती सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली़ यात प्रमुख काम विमानतळाच्या मार्गात अडथळा ठरणा:या पेंदरमल डोंगराच्या सपाटीकरणाचे आह़े हा डोंगरच पूर्ण सपाट करण्यात येणार असून, ते काम सुमारे 7 ते 8 कोटी क्युबिक मीटर असल्याचे त्यांनी स्पष्ट केल़े 
 
विमानतळाला 2क्72 हेक्टर जमीन 
लागणार आहे. यापैकी 455 हेक्टर जमीन संपादित करावयाची असून, त्यामुळे 1क् गावांतील 3क्क्क् कुटुंबे बाधित होणार आहेत़ सिडकोने देऊ केलेल्या पॅकेजला प्रकल्पग्रस्तांचा चांगला प्रतिसाद असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली़ 

 

Web Title: Mountain Stations for Navi Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.