‘एलपीजी’वर मोटारसायकल
By Admin | Updated: February 20, 2016 00:54 IST2016-02-20T00:54:03+5:302016-02-20T00:54:03+5:30
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याल अवसरीखुर्द मधील स्वयंचल विभागातील प्रकाश सावकार, सुमीत खेडकर, सुभाष खेडकर, मंगेश म्हस्के, धनेश भोर या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक के

‘एलपीजी’वर मोटारसायकल
अवसरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्याल अवसरीखुर्द मधील स्वयंचल विभागातील प्रकाश सावकार, सुमीत खेडकर, सुभाष खेडकर, मंगेश म्हस्के, धनेश भोर या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक के . एम. पवार, प्रा. विवेक पटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलपीजी गॅसवर चालणाऱ्या दुचाकीचा अभिनव प्रयोग केला आहे. २ किलो एलपीजी गॅसवर मोटारसायकल १६० कि.मी. चालत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
जयहिंद पॉलिटेक्निक कुरण येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रयोग प्रदर्शनात या प्रयोगासाठी उत्तम प्रतिसाद मिळाला. जी.एम.आर.टी. खोडद येथे विज्ञान प्रदर्शनातही हा प्रयोग प्रदर्शित करण्यात आला. वापरलेल्या एलपीजी गॅस दुचाकीच्या डिकीमध्ये टाकी ठेवून साठविण्यात येतो. पाइपच्या साहाय्याने तो दाब कमी करण्याच्या यंत्रापर्यंत पोहोचवला जातो. जास्त दाबात हा वायुस्वरूपातील गॅस कार्बोरेटरमध्ये सोडला जातो व पेट्रोलियमसारख्या ज्वलनासाठी इंजिनमध्ये सोडला जातो.
पेट्रोलऐवजी हा एलपीजी गॅस इंधन म्हणून वापरला जातो. एलपीजी गॅस स्वस्त आहे. मायलेज पेट्रोल ६० रुपये लिटर दर. एलपीजी गॅस ४० रु. किलो दर आहे. मोटार सायकल ६० रुपयांमध्ये ६० किलोमीटर चालते. त्यामुळे १ किलोमीटरसाठी १ रुपया खर्च येतो. एलपीजी गॅसला १ किलोमीटर ५० पैसे खर्च येतो. त्यामुळे ही मोटारसायकल आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
एलपीजी गॅसवर बनवलेली मोटारसायकल पाहण्यासाठी विद्यार्थी, ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.